
खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार राज्य उपाध्यक्ष के पी पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज गोवा बेळगाव मार्गावरील मनेरीकर बिल्डींग येथे करण्यात आले
यावेळी फीत कापुन गणेश पुजन व साईबाबा फोटो पुजन करून श्रीफळ वाढवुन उदघाटन करण्यात आले, यावेळी के पी पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख बंडु केरवाडकर, तालुका प्रमुख नारायण राऊत, युवासेना प्रमुख मोहन गुरव, मीडिया प्रमुख दतात्रय हेगडे, लक्ष्मण कृष्णा मनोळकर, नामदेव गावडे, महादेव लक्ष्मण गुरव, मारूती कल्याणी, आदि कार्यक्रते उपस्थित होते,

