
खानापूर : कौंदल ता खानापूर येथील पारायण सोहळ्याचा मुर्हतमेढ व पुजन भाजपाचे जेष्ठ नेते लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल उमाण्णा कोलेकर होते, कार्यक्रमाच्या निमित्ताने विठ्ठलराव हलगेकर यांना कर्नाटक राज्य वीजयरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ग्रां पं सदस्य उदय भोसले, ग्रामस्थ व पंच मंडळी उपस्थित होते,

यावेळी दीपप्रज्वलन
टोप्पाण्णा आप्पाणा पाटील निवृत्त कर्मचारी हेसकॉम, मारुती बाबुराव पाटील संचालक अर्बन बँक खानापूर, पुंडलिक बाबी जळगेकर निवृत्त शिक्षक, पुंडलिक उम्मांना कोलेकर प्रगतशील शेतकरी, अनंत धोंडू घाडी शिक्षक या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तर विविध देवतांच्या फोटोचे पुजन अनेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गावातील वारकरी संप्रदायातील वारकरी, ग्रामस्थ, पंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते,
