
खानापूर : ढोकेगाळी ता खानापूर येथील शेतकरी मारुती देवाप्पा पाटील यांच्या सात गवत गंजीना आज सायंकाळी आग लागून हजारो रुपयाचे नुकसान झाले आहे, गावातील नागरिकांनी अग्निशमन दलाच्या पथकाला संपर्क करून बोलावुन घेऊन आग विझविण्यात आली, गावातील नागरिकांनी सुध्दा आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले,
मारूती देवाप्पा पाटील यांची गुरे फार असल्याने त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून गावकऱ्यांनी थोडा चारा गोळा करून तात्पुरती व्यवस्था केलेली आहे पण पुढील व्यवस्था कशी करायची या चिंतेत सदर शेतकरी असून त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे त्यासाठी तलाठी, सर्कल, व तहसीलदारांनी ताबडतोब पंचनामा करून सदर शेतकऱ्यास त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यात यावीत अशी गावातील नागरिकांनी मागणी केली आहे,

