
बेळगाव येथील पांगुळ गल्लीतील श्री अश्वत्थामा मंदिराच्या समोर लोटांगण घालण्याचा कार्यक्रम पार पडला.
बेळगाव : होळीच्या दुसऱ्या दिवशी श्री अश्वत्थामा मंदिराच्या समोर लोटांगण घालण्याची परंपरा अनेक वर्षापासून चालत आली आहे.नवस पूर्ण झाल्याबद्दल हा लोटांगण घालण्याचा कार्यक्रम होतो.संपूर्ण वर्षभर नवस पूर्ण झालेले तसेच श्रद्धेपोटी शेकडो भक्त लोटांगण घालतात.
लोटांगण घालत असलेल्या भक्तांच्यावर पाणी ओतण्यात येते.लोटांगण घालत असताना हलगी वादन सुरू असते.संपूर्ण भारतात अश्वत्थामाची दोन मंदिरे आहेत त्यापैकी बेळगावात एक मंदिर आहे.लोटांगण कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
