
निपाणी,दिनांक 3 (प्रतिनिधी) :
मटका, अवैध जुगार, अवैध दारू विक्री अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना तडीपारी सुनावण्यात आली आहे.
चंद्रकांत शंकर वड्डर ( राहणार – अक्कोळ, निपाणी) आणि संजय (राहणार -जामदार प्लॉट, निपाणी) अशी तडीपारी सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. मटका, जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्री अशा विविध प्रकरणात गुंतलेल्या चंद्रकांत शंकर वड्डर याला कोलार जिल्ह्यात 9 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर 4 प्रकरणात गुंतलेल्या संजय याला रामदुर्ग तालुक्यात हद्दपार करण्यात आले आहे.
