बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांविरोधात प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, अशी मागणी मराठी भाषिकांनी केलेली असताना देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बेळगावात दाखल झाल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत. फडणवीस येणार असल्याची माहिती म ए समीतीच्या कार्यकर्त्यांना व नेतेमंडळींना मिळताच मोठ्या संख्येने एका चौकात जमलेल्या समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे दाखवले.
यावेळी निषेध नोंदविणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली असून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने सर्व मतदारसंघात एकच उमेदवार दिल्यामुळं मराठी भाषिक कार्यकर्त्यांत उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे,