
निदर्शने आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोप खाली दाखल गुन्ह्यातून म.ए. समितीच्या सात कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. येथील पाचवे कनिष्ठ न्यायालय व प्रथम वर्ग दंडाधिकारी न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
प्रादेशिक आयुक्त कार्यालयासह शहरातील विविध शासकीय कार्यालयात लाल पिवळा झेंडा लावून राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा आक्षेप समितीने घेतला होता. या संदर्भातील 2017 मध्ये झालेल्या आंदोलनावर हे गुन्हे दाखल झाले होते. धर्मवीर संभाजी चौक येथे काळीपट्टी बांधून निदर्शने केली होती. त्याला पोलिसांनी आक्षेप घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली. प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी समिती कार्यकर्त्यां विरोधात गुन्हा दाखल केला होता. या दाव्याची अंतिम सुनावणी झाली त्यात गुन्हे सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे समिती कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. महाराष्ट्रीय एकीकरण समिती कार्यकर्त्यांतर्फे एडवोकेट महेश बिर्जे, एडवोकेट बाळासाहेब कागणकर यांनी काम पाहिले.
