
खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यात वादळी चर्चा झाली एकमेकावर नाव न घेता आरोप प्रत्यारोप करण्यात आले. नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे सादर केले. असता सर्वांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. व पुढील आठवड्यात समितीची पुनर्रचना करण्याचे ठरविण्यात आले. व पुढील बैठक बोलाविण्याचा अधिकार माजी सभापती मारुतीराव परमेकर यांना देण्यात आला. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई होते. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी शिवस्मारक येथे आज 16 जुन रोजी समितीची बैठक बोलावण्यात आली होती.
सुरूवातीला प्रास्ताविक व स्वागत कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे यांनी केले. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबरराव पाटील म्हणाले की आज आपण विधानसभेची निवडणूक हरलेलो आहोत म्हणजे समिती संपली अशातला भाग नाही. समिती मजबुतीपणाने चालवणे हे तुमचे आमचे काम आहे. समिती चालवताना काही छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर त्या सांगणे माझ्या कार्यकर्ते बांधवांचे काम आहे. समितीच्या ईतिहासात ईतकी कमी मते मिळाली हे फक्त विरोधकांनी वाटलेल्या पैशामुळे झाले आहे.
या वेळी बैठकीत वादळी चर्चा झाली. नंदगड भागाचे समीती उपाध्यक्ष अर्जुन देसाई यांनी सुरूवातीला नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून आपल्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. व यापुढे समितीच्या प्रत्येक कार्यात प्रामाणिक पणे भाग घेणार असे सांगून पदाधीकारींच्या राजीनाम्याची मागणी केली.
समितीची जी 62 लोकांची निवडणूक कमिटी करण्यात आली होती. ती उमेदवारी निवड करताना जसी होती तसी निवडणुकीत सक्रिय राहीली नाही. तसेच कमिटी नीवड करताना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असल्याचा आरोप प्रत्येक कार्यकर्त्यांनी केला व कमिटीच्या पदाधिकारीनी राजीनामा देण्याची मागणी केली.
यावेळी म्हादेव घाडी, आबासाहेब दळवी, अर्बन बँकेचे चेअरमन अमृत शेलार, माजी सभापती मारुतीराव परमेकर, नारायणराव कापोलकर, निरंजन सरदेसाई, रमेश धबाले, संजय पाटील, सिताराम बेडरे, राजाराम देसाई, पावले गुरुजी यांची समितीच्या पराभवाच्या कारणांची मीमिसा करणारी भाषणे झाली. शेवटीं समितीचे कार्याध्यक्ष यशवंतराव बिर्जे व समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांची भाषणे झाली. त्यात त्यांनी समितीच्या पराभवाची नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला तो सर्वानुमते स्वीकारण्यात आला. व पुढील कार्यकारीणीची नीवड लवकरात लवकर करण्याचे ठरविण्यात आले.
सरकारी दवाखान्यावर फक्त कन्नड भाषेत नामफलक लावला आहे. गेल्यावेळी टीएचओ ना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी नामफलक बसविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अजुन नामफलक लावण्यात आला नाही. त्यासाठी पुढील बैठकीत आंदोलनाची दिशा ठरविण्याचे ठरले. यावेळी नागरीकांना भरमसाठ बील देण्यात आले आहे त्याबद्दल ही चर्चा करण्यात आली. बैठकीला म्हणावी तशी कार्यकर्त्यांची उपस्थिती नव्हती अनेक प्रमुख नेते मंडळींची बैठकीला गैरहजरी होती.
बैठकीला मरूगावडा पाटील, प्रकाश चव्हाण, प्रल्हाद मादार, ईश्वर बोबाटे, व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
