
सीमा सत्याग्रही आणी समीती कार्यकर्त्यांच्या हजारोंच्या उपस्थित समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटीलांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, ढोल-ताशा टाळ मृदंगाच्या गजरात भगवेमय आणी दिंडीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता,
खानापूर ता .17 : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी हजारोंच्या संख्येने उपस्थित आसलेल्या समिती कार्यकर्त्यांच्या साक्षीने दाखल करण्यात आला. पारंपारिक वाद्य ढोल ताशा, भजन, गवळी नृत्य, टाळ मृदंगाच्या गजरात भगवे फेटे धारण केलेल्या समिती कार्यकर्त्यांच्या सहभागाने शहरातील वातावरण भगवेमय झाले होते. वारकऱ्यांनी काढलेल्या दिंडीत महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.
सोमवारी सकाळी ११ वा. उमेदवार मुरलीधर पाटील, बेळगाव दक्षिण क्षेत्राचे उमेदवार रमाकांत कोडुसकर, तालुका समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बिरजे, माजी आ. दिगंबर पाटील, सीमा सत्याग्रही नारायण लाड , शंकरराव पाटील, मध्यवर्ती समितीचे प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी आदींच्या हस्ते चौराशी देवीची पुजा करण्यात आली. यावेळी खेडोपाड्यातुन आलेल्या भजनी मंडळानी अभंग सादर केले. त्यानंतर पारिश्र्वाड रोड, बाजारपेठ, गुरव गल्ली घाडी गल्ली, देसाई गल्ली, चिरमुरकर गल्ली, स्टेशन रोड मार्गे हजारोंच्या संख्येने जमलेल्या समिति कार्यकरत्यानी भव्य मिरवणुक काढली.
यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी कार्यकर्त्यानी परिसर दणाणून सोडला होता,
शिव स्मारकातील शिवछत्रपतींच्या मुर्तीला अभिवादन करुण श्री मुरलीधर पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणुक अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आला.
ढोल ताशा आणि गवळी नृत्याने लक्ष वेधले
मराठी भाषिक गवळी बांधवांनी अर्ज भरण्यासाठी मोठी उपस्थिती लावली होती . त्यांनी पारंपरिक वॆषात गवळी नृत्य सादर करत समितिच्या विजयाच्या घोषणा दिल्या. करंबळ येथिल ढोल ताशा आणी झांज पथकाने देखिल स्फूर्तिदायी वादन करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होतॆ,

सीमा सत्याग्रहींची अर्त हाक,
आयुष्यभर सीमा चळवळीत लढणाऱ्या सीमा सत्याग्रहींनी आपल्या हातात युवकांना आमचे स्वप्न पूर्ण करा अशा आशयाचे फलक हाती घेत तरुणांना जागृत केले. तसेच माय मराठीच्या रक्षणासाठी समितीच्या चळवळीत सामील व्हा, मराठी माणसा जागा हो समितीचा धागा हो, आमिषांना नका घालू भीक आमच्यासाठी समितीच ठीक, अस्मितेच्या रक्षणासाठी समिति मैदानात अशा विवीध आशयाचे फलक हाती घेत तरुणांनी नागरीकांना समीतिला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तळपत्या पायी चालत जाणाऱ्या सिमा सत्याग्रहीनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या.

