
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज सोमवार दिनांक 17 एप्रिल रोजी सकाळी संपूर्ण खानापूर शहरातून मिरवणूक काढून स्टेशन रोड येथील हुतात्मा स्मारकला अभिवादन करून हुतात्म्यांचे आशीर्वाद घेऊन तशिलदार कचेरी येथील खानापूर विधानसभेच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिगंबरराव पाटील कार्याध्यक्ष यशवंतराव बिरजे समिती कार्यकारिणी सदस्य आबासाहेब दळवी, मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर व सीमा सत्याग्रही नारायण मामा लाड यांनी दिली आहे, तसेच तालुक्यातुन सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने समितीचा विजय निश्चित होणार असल्याचे म्हटले आहे,
यावेळी समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर गणपतराव पाटील यांनी पुढे बोलताना सांगितले की खानापूर विधानसभा मतदार संघातील बऱ्याच गावांमधून प्रचार फेरी व जनजागृती झालेली असून जवळ जवळ 100 पेक्षा जास्त गावांना भेटी दिलेल्या असून त्या ठिकाणाहून चांगला आणि उत्तम प्रतिसाद मिळत असून त्यांनी आपला विजय निश्चित असल्याचे म्हटले आहे,
