
खानापूर समितीचे अध्यक्ष श्री सूर्याजी पाटील यांचा त्यांच्या जळगे गावात जाहीर सत्कार खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री सूर्याजी सहदेव पाटील यांचा त्यांच्या जळगे या गावी नागरिकाकडून जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सभेचे अध्यक्ष निवृत्ती शिक्षक सातेरी गुरव हे होते.

त्यानंतर खानापूर समितीच्या वतीने संपर्क दौऱ्याला सुरुवात करण्यात आली. यावेळी समितीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई, माजी सभापती सुरेश राव देसाई, पीएच पाटील, खानापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख दयानंद चोपडे, लक्ष्मण पाटील, प्रकाश पाटील, बळीराम पाटील, रवींद्र पाटील, राजू पाटील, नितेश पाटील, निंगाप्पा पाटील, संभाजी पाटील, पुंडलिक शिवणगेकर, आनंद पाटील शशिकांत गुरव, धनाजी गुरव विठ्ठल पाटील, बबन गुरव, बाबू गुरव, शिवाजी गुरव, मनोहर नंदाळकर, नारायण पाटील, टी एस पाटील, नारायण मा पाटील, विजय निलजकर, नागेश पाटील सहदेव पाटील, गंगाराम पाटील, प्रेमानंद पाटील, गणपती पाटील आदी उपस्थित होते,

यावेळी बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षपदी समितीच्या ज्येष्ठ निष्कलंक निष्ठावान व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाली आहे. गेल्या बऱ्याच वर्षापासून सूर्याजी पाटील यांनी तन मन धनान समितीची सेवा केलेली आहे. अशा व्यक्तीची निवड झाल्यामुळे सीमा प्रश्नाबद्दल आघाडीवर असणाऱ्या जळगे गावचा सन्मान करण्याचा प्रयत्न झालेला आहे. असे वक्तव्य समितीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव देसाई यांनी केले. खानापूर शिवसेनाप्रमुख दयानंद चोपडे यांनी सुद्धा शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत शिवसेना मूळ समितीच्या पाठीशी खंबीरपणाने थांबलेली आहे. सूर्याजी पाटील सारख्या व्यक्तींची अध्यक्षपदावर निवड झाली त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह द्विगुणीत झालेला आहे. खानापूर शिवसेना ही त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देऊन त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत राहील असे सांगितले. तसेच इदलोंढचे लक्ष्मण पाटील यांनी समितीच्या मागील घडामोडींना उजाळा देऊन सूर्याजी पाटील सारख्या समिती निष्ठ व्यक्तीची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांच्या केलेल्या कार्याला न्याय मिळाला आहे. असे सांगितले समितीच्या बऱ्याच कार्यकर्ते व नेत्यांना आमदारपदी निवडून आणण्यासाठी सूर्याजी पाटील यांनी प्रामाणिकपणाने कार्य केले आहे. माजी सभापती सुरेश राव देसाईने सूर्याजी पाटील यांनी समितीसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करून मराठी भाषिकांमध्ये यांच्या निवडीमुळे चांगला संदेश जाण्यास मदत झाली आहे. असे सांगितले यावेळी सत्काराला उत्तर देताना सूर्याजी पाटील यांनी समितीमध्ये पहिल्यापासून ते आतापर्यंत कशा पद्धतीने समितीच्या कार्यात झोकून दिले. मध्यवर्ती समिती स्थापनेपासून सदस्य असताना आज पर्यंत कशा पद्धतीने चढउतारांना सामोरे गेलो व समितीशी एकनिष्ठ राहून यापुढेही कार्यरत राहू अशी ग्वाही दिली. त्यानंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली

