
सावरगाळी : खानापूर – लोंढा -रामनगर महामार्गावर अवघ्या 6 ते 7 की मी अंतरावर असलेल्या खानापूर तालुक्यातील सावरगाळी गावात पश्चिम बंगालमधील एक मनोरुग्ण व्यक्ती भटकत भटकत सावरगाळी गावात आली असता गावातील सामाजिक कार्यकर्ते मोहन पाटील यांनी त्याची आस्थेने विचारपुस व चौकशी करून त्याच्या घरच्या लोकांशी संपर्क साधला व दोन दिवस त्याची रहाण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करून काल रविवारी दि 2 एप्रिल 2023 रोजी त्याचे नातेवाईक आल्यानंतर त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले,
या बाबत मिळालेली माहिती असी की शुक्रवार दि 31 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6-30 च्या दरम्यान एक व्यक्ती मोहन पाटील यांच्या घरच्या पाठीमागील जागेत परसु मध्ये घुसलेली कोणीतरी पाहीली व याची कल्पना मोहन पाटील यांना दिली असता चोर वैगेरे कोणीतरी आला असेल असा विचार करून शोध घेतला असता त्याठिकाणी कोणीही आढळून आले नाही परंतु दुसरे दिवशी सकाळी लपुन बसलेली ती व्यक्ति त्यांच्या परसातून बाहेर आली व सकाळी वीट भट्टीवर कामासाठी जात असलेल्या महिलांच्या पाठीमागून जाऊ लागला असता सदर महिला घाबरल्या व बोंब मारली असता आपल्या घरात असलेले मोहन पाटील व ग्रामस्थानी त्या ठिकाणी धाव घेतली असता सर्व महिला व ग्रामस्थ त्या व्यक्तीला मारण्यासाठी धावले असता परिस्थितीचे भान ओळखून मोहन पाटील यांनी त्यांना सावरले व सदर व्यक्तीची चौकशी केली असता त्याला हिंदी बोलता येत नव्हते व बंगालीमध्ये काहीतरी बोलत होता शेवटी त्याची परिस्थिती लक्षात घेता तो मनोरुग्ण असल्याचे सर्वांनाच समजले शेवटी मोहन पाटलांनी पोलीसांच्या 112 नंबर गाडीला फोन करून बोलावून घेतले पोलीस आले त्यांनी त्याला इशारा करून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव टापूसिंग असल्याचे सांगून आपल्या घरचा फोन नंबर दिला असता त्यावर मोहन पाटील यांनी संपर्क साधला असता त्याच्या आईने तो फोन उचलला तिला हिंदी चांगले बोलता येत असल्याने तिने सांगितले की टापूसींग आपला मुलगा असून तो मनोरुग्ण आहे, पंधरा दिवसापुर्वी घरी भांडण करून गेला असुन तो हरवला असुन आपन ब्रम्हपुरा पश्चिम बंगाल येथील रहिवासी असल्याचे सांगितले व आपल्या मुलाला तुमच्याकडे ठेवून घ्या त्याला सांभाळा आम्ही येवून घेऊन जातो असे सांगितले व आपला मुलगा टापुसींग बरोबर बोलली व तेथेच रहाण्यास सांगितले,

मोहन पाटील यांनी सदर व्यक्तीस घेऊन जाण्याची विनंती केली असता पोलीसांनी नकार दिला….
पोलीसांनी त्या व्यक्तीस आपल्या बरोबर नेण्यास नकार दिला व आपली जबाबदारी झटकली व आम्ही याला कोठे घेऊन जाऊ त्याची सोय कोठे करू असे म्हणून वरीष्ठाशी फोनवरून चर्चा केली असता वरिष्ठांनी सुध्दा आम्हाला काय करता येत नाही त्याचे नातेवाईक येईपर्यंत तुम्हीच त्याचा सांभाळ करा असे सांगीतले त्यानंतर पोलीस गेले,
मनोरूग्णाच्या आईने आपला जावई चंदनसींग ला याची कल्पना दिली,
दरम्यान याची कल्पना मनोरूग्णाच्या आईने आपला जावई चंदनसींग ला फोनवरून दिली व त्याला मोहन पाटीलांचा संपर्क क्रमांक दिला असता त्याने मोहन पाटील यांना फोन केला व पत्ता विचारला, असता मोहन पाटील यांनी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील सावरगाळी येथे मनोरुग्ण व्यक्ती असल्याचा पत्ता सांगीतला असता तो जावई कॅन्टर ड्रायव्हर होता तो योगायोगाने बेंगलोर येथे आपली भरलेली कँन्टर ट्रक खाली करत होता त्याने सांगितले की मी बऱ्याच वेळा बेळगावला ट्रक घेवून आलो आहे व हा परिसर माझ्या परिचयाचा असल्याचे सांगितले कारण ट्रक घेऊन या बाजूला बऱ्याच वेळा तो आला होता ताबडतोब त्यानें बेंगलोर येथे बस पकडली व बेळगावला आला व बेळगावहून खानापूर खानापूरहून सावरगाळी असा प्रवास करत चंदनसींग सावरगाळी येथे पोहचला असता त्याने आपल्या भाषेत आपला मेव्हणा टापुसींग ची चौकशी केली व त्याला धिर दिला,
पोलीसांनी टापुसींग ला चंदनसींग च्या ताब्यात देण्यास सांगितले
मोहन पाटील यांनी पुन्हा पोलीसांना याची कल्पना दिली व सदर मनोरुग्ण व्यकतीचा नातेवाईक आला असल्याचे सांगितले व त्यांना फोनवरून त्यांच्याशी बोलण्यास सांगितले असता पोलीसांनी त्याची चौकशी करून माहिती घेतली व मोहण पाटील यांना मनोरुग्ण व्यक्तीस त्यांच्या स्वाधीन करण्यास सांगितले असता मोहन पाटील यांनी सदर मनोरुग्ण व्यक्ती टापुसींग ला त्याचा नातेवाईक चंदनसींगच्या ताब्यात दिले,
मोहन पाटील यांनी केलेले हे कार्य प्रशंसनीय तर आहेच त्याबरोबर ईतरानीही या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे व माणुसकी व मनुष्य धर्म कसा जपला पाहिजे हे शिकले पाहिजे,
टापुसींग सावरगाळी गावात कसा आला
सावरगाळी येथील एका ग्रामस्थाने टापुसींग ला ओळखले व आपण याला लोंढा रेल्वे स्थानकावर भटकताना पाहिले होते व टीसीने तिकीट नसल्याने त्याला रेल्वेतून उतरवले असल्याचे तेथील लोक सांगत होते असे सांगितले, व तेथून तो भटकत सावरगाळी पर्यंत आला असेल असा अंदाज बांधण्यात आला,
