
रविवार दि.25 /12/2022रोजी नवोदित मुलांना शिक्षणाबरोबर अभ्यास ,खेळ, व्यायाम व योगा यांसारख्या मैदानी खेळांकडे वळवण्यासाठी, त्यांना शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विश्वभारती कला व क्रीडा संघ बेळगाव यांच्यावतीने गटनिहाय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उत्सुक स्पर्धकांनी सकाळी 9:00 वा. बिडी येथील मैदानावर उपस्थित राहून सहभागी व्हावेत असे आवाहन विश्वभारती कला व क्रिडा संघ बेळगाव यांनी केले आहे
स्पर्धा पुरुष व महिला गटांत होईल .पहिली ते चौथी 200 मीटर, पाचवी ते सातवी 400 मीटर ,आठवी ते दहावी 800 मीटर ,खुला गट 1500 मीटर, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1000मीटर अशी मॅरेथॉन स्पर्धा होईल,.👉🏻 स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येईल. मोफत प्रवेश असून स्पर्धकांनी स्वजबाबदारीने आपल्या पालक किंवा शिक्षकासह येणे. समाज हितचिंतकांनी समाजाच्या परिवर्तनासाठी या स्पर्धेला वस्तू रुपात आपला हातभार लावावा असे आयोजकांनी सांगितले आहे
