
खानापूर : खानापूर येथील श्री मलप्रभा नदी घाटावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवका कडून आज सकाळी घाट स्वच्छता मोहिम राबविण्यात आली,
नुकताच शिवरात्रीला व अमावस्येला भाविकांच्या झालेल्या गर्दिमुळे मलप्रभा नदी च्या दोन्ही बाजूचा घाट टाकाऊ वस्तु, कपडे लते, जीर्णवस्तू, प्लास्टिक पिशव्या आदि वस्तूंचा ढीग पडल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले होते,

काहि दिवसापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी एक बाजूचा घाट स्वच्छ करून तीन ट्रॅक्टर घाण वस्तू जमा केल्या होत्या परंतु नदीच्या पलीकडील घाट स्वच्छते अभावी तसाच राहिला होता,

भाविकांची गैरसोय होत होती नगरपंचायत पण लक्ष द्यायला तयार नव्हती निवडून दिलेले नगरसेवक नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष फक्त नावा पुरतेच राहिले आहेत त्यांचे सुद्धा दुर्लक्ष होत होते, शेवटी पुन्हा परत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याची दखल घेऊन संघाच्या स्वयंसेवकानी आज सकाळी 7-00 वा नदिच्या पलीकडे असलेल्या घाटावरील प्लास्टिक, कचरा, कपडे, फोटो फ्रेम एक ट्रॅक्टर भर गोळा करून जाळून नष्ट केले व भाविकांची गैरसोय टाळली त्यामुळे भाविकांनी व नागरिकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या वीद्यायक कार्याबद्दल संघाच्या स्वंयवसेवकांना धन्यवाद दिले आहेत,
