
बेळगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली नसली तरी, निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगानेही तयारी केली असून जिल्ह्यातील अठरा मतदारसंघांत निवडणूक अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्यांचा समावेश आहे.
बेळगाव दक्षिण : महापालिका आयुक्त, बेळगाव उत्तर : महापालिका प्रशासन उपायुक्त, बेळगाव ग्रामीण : बुडा आयुक्त, निपाणी : स्मार्ट सिटी एमडी, चिकोडी-सदलगा : चिकोडी प्रांताधिकारी, अथणी : कृषी खात्याचे सहसंचालक, कागवाड : भूसंपादन अधिकारी, कुडची : हिडकल डॅमचे भूसंपादन अधिकारी, रायबाग : जि. पं. व्दितीय उपसंचालक, हुक्केरी : जि. पं. उपसचिव, अरभावी : बैलहोंगल प्रांताधिकारी, गोकाक : काडा प्रकल्प भूसंपादन अधिकारी, यमकनमर्डी : प्रांताधिकारी, खानापूर : राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन अधिकारी, कित्तूर : बुडा भूसंपादन अधिकारी, बैलहोंगल : काडा प्रशासक, सौंदत्ती-यल्लाम्मा : पशुसंगोपन उपसंचालक, रामदुर्ग : काडा उपप्रशासक.
