
संपूर्ण देशभरात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक पाळीव जनावरे मृत्युमुखी पडत पडली असून खानापूर तालुक्यात सुद्धा अनेक गावात लंपी रोगाची लागण झालेली दिसून येत असून बऱ्याच ग्रामीण भागात लंपी रोगाने अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत त्यासाठी अनेक गावात वार पाळले जात असून आपापले शेती धंदे कामधंदे व्यवसाय बंद करून वार पाळले जात आहेत,
खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी गावात सुद्धा काल वार पाळण्यात आले संपूर्ण गावातील नागरिकांनी आपापले शेती धंदे व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन काल सोमवार दिनांक 5 डिसेंबर रोजी संपूर्ण रूमेवाडी गावात कामधंदे बंद ठेवून वार पाळण्यात आले तसेच रुमेवाडी गावच्या हद्दीत असलेल्या रूमेवाडी नाक्यावरील दुकानदार व व्यापारी वर्गाला सुद्धा बंद पाळण्याची सक्त ताकीद देण्यात आली याचाच परिणाम म्हणून रूमेवाडी नाक्यावरील संपूर्ण दुकानदार व हॉटेल व्यवसायकांनी सुद्धा आपापली दुकाने बंद ठेवून वार पाळले त्यामुळे खानापूर गोवा महामार्गावर असलेल्या रूमेवाडी नाक्यावर काल संपूर्ण दिवसभर शुकशुकाट पसरला होता व या गोष्टीची कल्पना नसल्याने बाहेर गावचे लोक आश्चर्य चकीत होवून शुकशुकाट का पसरला आहे म्हणून माहिती घेवून आस्थेने चौकशी करत होते,

व्यापारी वर्ग व गावातील काही नागरिकांशी आम्ही संवाद साधला असता त्यांचे म्हणणे असे आहे की लंपी रोगाची लागण फक्त पाळीव जनावरांना गायी बैल म्हैस बकरी या पाळीव जनावरांना झाला असून याचा संबंध व्यापारी वर्गासी आहे का दुकान धंदे, व्यापार व्यवसाय बंद ठेवल्याने रोग आटोक्यात येणार का असा सवाल काही नागरिक व व्यापारी वर्ग करत आहेत त्याचे म्हणणें असे आहे की लंपी रोगाची लागण पाळीव जनावरांमध्ये दिसून येत असल्याने ग्रामस्थांनी जनावरांची काळजी घ्यावीत आपापल्या घरात किंवा आपापल्या शेतात जनावरांना बांधून ठेवण्यात यावेत गावातील इतर जनावरात त्यांना मिसळण्यास देऊ नयेत अशी खबरदारी घेऊन पाळणूक केली तर जेनेकरून लंपी रोग आटोक्यात येईल काय दुकाने बंद ठेवण्यात आल्याने लंपी रोग आटोक्यात येईल याचा विचार ग्रामस्थांनी व पंचमंडळीनी करावात अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी आपलं खानापूर शी बोलताना दिली आहे तर काही नागरीकांचे म्हणणे असे आहे वार पाळुन शेती व्यवसाय बंद करणे हि प्रथा परंपरेनुसार पुर्वीपासून सुरू आहे घेतलेला निर्णय योग्य असल्याचे बोलत आहेत, पण एकंदरीत सर्वांच्या म्हणण्यानुसार पुढील सोमवारी वार पाळताना रूमेवाडी नाक्यावरील व्यापारी वर्गाला यातुन वगळण्यात यावेत अशी ही मागणी काहीजण करत आहेत
शेवटी कोणाचे ही म्हणणें काहींही असू देत शेवटी रुमेवाडी ग्रामस्थ व पंच मंडळीच याबाबत विचार करून निर्णय घेतील यात शंकाच नाही
