
कौंदल ता. खानापूर येथे सालाबादप्रमाणे आज माऊली देवी कार्तिक एकादशी निमित्त कार्तिकोत्सव व श्री हनुमान मंदिरासमोर तुलसी विवाह मोठ्या उत्साहात पार पडला.

या उत्साहाला खानापूर तालुक्याचे माजी आमदार भाजपा नेते व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री अरविंद चंद्रकांत पाटील, ता पं माजी सभापती श्री सयाजी पाटील, माजी एपीएमसी अध्यक्ष श्री रामचंद्र पाटील, ग्राम पंचायत सदस्य श्री उदय ना भोसले, माजी ग्राम पंचायत सदस्य श्री सतिश टो पाटील,

तसेच श्री पुंडलिक कोलेकर, श्री विठ्ठल कोलेकर, खानापूर को ऑप बॅंकेचे संचालक श्री मारुती पाटील, श्री टोपान्ना पाटील, श्री महेश कोलेकर, श्री देवानंद सनदी, श्री बाबुराव कोलेकर, डॉ श्री श्रीकांत घाडी, श्री अनंत धो घाडी, श्री महेश जळगेकर यांच्यासह गावातील पंचमडळी ग्रामस्थ महिला भगिनी युवक युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
