
खानापूर शहरातील गटारीचे घाण पाणी श्री मलप्रभा नदीत सोडण्यात येत असून ते खानापूर नगरपंचायतीने ताबडतोब बंद करावेत अशी मागणी कुपटगीरी येथील सामाजिक कार्यकर्ते जोतिबा पाटील यांनी केली आहे
शहरातील गटारीचे घाण पाणी संडासचे पाणी व इतर घाण पाणी श्री मलप्रभा नदी पात्रात सोडण्यात येत असून ते पाणी मलप्रभा नदीत मिसळल्याने पुढील गावे कुपटगिरी, करंबळ, जळगे,चापगाव, तसेच इतर गावचे लोक हे पाणी वापरत असल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असून जनावरे सुद्धा आजारी पडत आहेत याची दखल ताबडतोब संबंधित खात्याने किंवा नगरपंचायतीने घेऊन हे पाणी ताबडतोब बंद करावेत व याची इतरत्र विल्हेवाट लावावीत अन्यथा वरील सर्व गावातील ग्रामस्था तर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते ज्योतिबा पाटील यांनी दिला आहे व वरील व्हिडिओ सुद्धा त्यांनी आपलं खानापूरकडे पाठवला असून आम्ही तो बातमी सोबत जोडला आहे,
