
मिरज-लोंढा रेल्वे दुपदरीकरण मार्ग अंतिम टप्प्यात असल्याने, रेल्वे फाटक दुरूस्तीचे काम हाती घेतण्यात आले आहे. त्यामुळे रुमेवाडी क्रॉस वरून हेम्मडगाकडे होणारी वाहतूक दि ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२२ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी या मार्गावरुन प्रवास करणार्यांना खानापूर- असोगा- मणतुर्गा किंवा रामनगर -अनमोड मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
