
प्रथमता कारखान्याच्या आवारात कारखान्याचे संस्थापक माजी आमदार कै निळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा बसविण्याच्या जागेचे पुजन त्यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष प्रतापराव सरदेसाई व नातु दिग्विजय सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले पाया खुदाई कारखान्याचे चेअरमन वीठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, एम डी सदानंद पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, यशवंत बिर्जे, व आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी कारखान्याचे अधीकारी बाळासाहेब शेलार यांनी सर्वांचे स्वागत केले, यानंतर ऊसाची मोळी आणलेल्या बैलगाडीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली, खासदार ईराण्णा कडाडी व मठाधिपतींच्या हस्ते मोळीची पुजा करून सभेला सुरूवात करण्यात आली कारखान्याचे एम डी सदानंद पाटील यांनी स्वागत करून कारखान्याचा आढावा घेणारे भाषण केले यानंतर शेतकरी नेते राज्यसभा खासदार श्री ईराण्णा कडाडी यांचे भाषण झाले ते म्हणाले की शेतकर्यांनी ऊस पाठवुन कारखाना वाचवला पाहीजे कारखाना वाचला की आपोआप शेतकरी वाचतो, कारखान्यासाठी जी काही सरकार कडून मदत लागेल ती सरकारदरबारी प्रयत्न करून आपण मिळवून देतो असे सांगितले, कारखान्याचे चेअरमन वीठ्ठलराव हलगेकर यांनी कारखान्याला येणाऱ्या समस्या सांगीतल्या तसेच यावर्षी काहीही करून पाच लाख टनापर्यंत ऊस गाळप करण्याचे उधीष्ट असल्याचे सांगून शेतकर्यांना 2500 रू पहिला हप्ता देण्याचे जाहीर केले, तसेच कारखान्याच्या कर्मचारी वर्गाचा पगार सुध्दा वाढीव करून देणार असल्याचे सांगितले, यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल, बसवराज सानीकोप व आदींची भाषणे झाली, सुत्र संचालन पत्रकार वासुदेव चौगुले यांनी केले,
यावेळी श्री प पु रामदास महाराज, चन्नबसव देवरू रूद्रस्वामी मठ, पिरनाथजी श्री क्षेत्र हंडीभडंगनाथ, शंभुलिंग शिवाचार्य महास्वामी, शिवपुत्र महास्वामी, अडवीसीध्देश्वर स्वामी, पीरयोगी मंगलनाथ महाराज, चन्नवीर देवरू, मृत्युंजय स्वामी, हे मठाधिपती व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, कीरण यळूरकर,भाजपा नेत्या, धनश्री सरदेसाई, मल्लिकार्जुन वाली, माजी जिल्हा परिषद सदस्य जोतीबा रेमाणी, आबासाहेब दळवी, बसवराज सानीकोप, ता पं सदस्य वासुदेव नांदुरकर, व हजारो शेतकरी बांधव उपस्थित होते, विषेश म्हणजे पाऊस असुन देखील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने हजरी लावली होती,


