सरहद्द कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित ” ५ वी कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन ” दि. १७ सप्टेंबर २०२३ रोजी कारगिल येथे संपन्न होणार आहे.आपल्या शूर जवानांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी ही मॅरेथॉन घेतली जाते. या मॅरेथॉनचे रेस डायरेक्टर श्री वसंत गोखले पुणे ( राष्ट्रीय खेळाडू, आंतरराष्ट्रीय पंच तसेच पटियाला येथील मान्यताप्राप्त मार्गदर्शक ) यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वभारती क्रीडा संघटना बेळगाव “विश्वभारती कारगिल मॅरेथॉन -2023 आयोजित करत आहे
ही मॅरेथॉन ४ जून २०२३ रोजी बेळगाव येथे संपन्न होणार आहे व या आगळ्यावेगळ्या मॅरेथॉनची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत.
१. ही स्पर्धा 42.195 किलोमीटर अंतराची असून त्यामध्ये अठरा वर्षावरील सर्व महिला व पुरुष भाग घेऊ शकतात.
२. पुरुष पहिले तीन विजेते व महिला तीन विजेत्यांची श्री गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारगिल येथील स्पर्धेसाठी विशेष तयारी (कोचिंग) करून घेण्यात येईल कारण हाय अल्टिट्यूडमध्ये “कारगिल मॅरेथॉन २०२३ मॅरेथॉन पळण्यासाठी शारीरिक वेगळ्या क्षमतेची तयारी आवश्यक आहे.
३. या प्रत्येकी तीन विजेत्यांना कारगिल येथील मॅरेथॉन सप्टेंबर २०२३ मध्ये भाग घेण्याची संधी उपलब्ध होईल व त्याचा सर्व खर्च विश्वभारती क्रीडा संघटना करणार आहे.
३. तरी या मॅरेथॉनमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी खालील गुगल लिंक वर आपले रजिस्ट्रेशन करावे ही विनंती
आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क
विश्व भारती कला व क्रीडा फाउंडेशन बेळगाव
अनिल देसाई 8277436412
रवी बिर्जे. 9823089994
स्पर्धेत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://forms.gle/4JtNf9QZD2HymavJ7