कामशिनकोप्प ता. खानापूर येथे घरासमोर तुटलेल्या विज तारेचा स्पर्श होऊन कु. वरूण बसाप्पा कोलकार वय 6 या बालकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना समजताच भाजपा नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी आमदार श्री अरविंद पाटील यांनी खानापूर शासकीय दवाखान्यात जाऊन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संजय नांद्रे यांना भेटून व पोलिस ठाण्यात संपर्क साधुन पंचनामा करून उत्तरिय तपासणी ताबडतोब करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यास सांगितले.