
खानापूर अनमोड रस्त्यावर मणतुर्गे जवळ फाटक असलेल्या रस्त्याची दुरूस्ती सुरू असल्याने 15 ऑक्टोंबर पर्यंत सदर रस्ता बंद करण्यात आला होता पण अवकाळी पावसामुळे रस्ता दुरूस्ती करण्यास अडथळा निर्माण झाल्याने अजुनही रस्ता झाला नसल्याने या भागातील15 ते 20 गावच्या लोकांची गैर सोय होत असल्याने

भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुका अध्यक्ष संजय कुबल, जनरल सेक्रेटरी गुंडू तोप्पीनकट्टी यांनी त्या ठिकाणी भेट देवुन रेल्वेचे अभियंता श्रीधर व कॉंट्र्याक्टर यांची भेट घेवून दिवस रात्र काम सुरू ठेवुन लवकरात लवकर रस्ता करून लोकांना रस्ता मोकळा करून देण्यास सांगितले असता

त्यांनी सांगितले की पावसाचा व्यतय येत असल्याने सदर कामाला वेळ लागत असुन पावसाने साथ दिल्यास येत्या दोन दिवसात रस्ता सुरू करून देण्याची ग्वाही दिली आहे
