
कडोली, दिनांक 1 जानेवारी : येथील मराठी साहित्य संघातर्फे रविवार दिनांक 8 जानेवारी 2023 रोजी 38 वे कडोली मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाची मुहूर्तमेढ सोमवार, दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता रोवण्यात येणार असून हा कार्यक्रम श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाच्या आवारात आयोजित केला आहे.
श्री दुरदूंडेश्वर विरक्त मठाचे आदरणीय स्वामीजी म.नि.प्र. श्री. गुरु बसवलिंग स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हा मुहूर्तमेढ समारंभ होणार आहे.
तरी गावातील नागरिक, विविध संघ, संस्थांचे पदाधिकारी,शिक्षक, संमेलनाचे सर्व कार्यकर्ते व साहित्य रसिकांनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कडोली मराठी साहित्य संघातर्फे करण्यात आले आहे.
