
कब्बडी हा आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ असून, कब्बडी च्या माध्यमातून आपल्याला कब्बडी व कुस्ती या राष्ट्रीय खेळाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मिळावेत म्हणून या कब्बडी खेळाचे आयोजन केले असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते व लैला शुगरचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी नागुर्डा येथील कब्बडी स्पर्धेचे उदघाटन करताना केले,
या वेळी त्यांच्या हस्ते फीत कापून कब्बडी स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले, सदर कब्बडी स्पर्धेची बक्षीसे विठ्ठलराव हलगेकर यांनी प्रायोजित केली आहेत, यावेळी खानापूरचे थोर विचारवंत व साहित्यिक कै सरदेसाई यांचे सुपुत्र समितीचे युवा नेते निरंजन सिंह सरदेसाई यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले या वेळी त्यांनी सुध्दा आपले मौल्यवान विचार मांडले,

यावेळी भाजपाचे युवा नेते पंडित ओगले, लैला शुगरचे एम डी सदानंद पाटील, सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील, आदि मान्यवर मंडळी व नागुर्डा ग्रामस्थ व युवा वर्ग व कब्बडी प्रेमी उपस्थित होते,
कब्बडी स्पर्धेला उपस्थित क्रीडा प्रेमी
