
कन्या विद्यालय नंदगड येथे आज दहावीच्या विद्यार्थिनीचा निरोप समारंभ व बक्षीस समारंभ अति उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीत व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.नारायण मष्णू गुरव होते
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सौ.अश्विनी मारुती पाटील, श्री.विठ्ठल शिवाजी पारिश्वाकर, श्री.काशिनाथ रेडेकर, श्री.मंजुनाथ केलवेकर उपस्थितीत होते.या कार्यक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री.एस एम.कदम यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.या कार्यक्रमामध्ये विद्यार्थिनींनी भाषणांमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.तसेच खेळामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून श्री.एस डी पाटील संभाजी हायस्कूल बेलूर चे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सी.आय.पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सौ.एस.व्ही.बेंचेकर यांनी केले. शाळा सुधारणा समितीचे सदस्य श्री.एम.आर.पाटील, श्री.सुदेश दलाल, श्री.सुनील जुंजवाडकर, श्री.रमाकांत पाटील, श्री.मारुती गुरव, श्री.मधुकर पाटील,श्री.सुहास पाटील,सौ नेहा नाईक,सौ दिक्षा बेळगावकर इत्यादी उपस्थितीत होते.कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गीताने करण्यात आली.
