धावत्या बसमधील निष्काळजीपणा ठरला जीवघेणा; खिडकीबाहेर डोके काढताच टिप्परची धडक, आयटीआय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू.
कुंदगोळ (धारवाड) : प्रतिनिधी
धारवाड जिल्ह्यातील कुंदगोळ परिसरात घडलेल्या एका अत्यंत दुर्दैवी अपघातात धावत्या बसच्या खिडकीतून डोके बाहेर काढलेल्या 17 वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. टिप्परची जोरदार धडक बसल्याने विद्यार्थ्याचे शिर धडापासून वेगळे झाले. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत विद्यार्थ्याचे नाव फकिरेश (वय 17) असून तो धारवाड जिल्ह्यातील शिरूर गावचा रहिवासी होता. फकिरेश आयटीआयचे शिक्षण घेत होता. तो हुबळीहून गदग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करत होता. बसच्या मागील बाजूच्या आसनावर बसलेल्या फकिरेशने प्रवासादरम्यान गुटखा थुंकण्यासाठी खिडकीबाहेर डोके काढले. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून संबंधित प्रकरणाची नोंद करून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर धावत्या वाहनातून हात, डोके किंवा शरीराचा कोणताही भाग बाहेर काढू नये, असा सल्ला वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा प्रवाशांना दिला आहे. अशा प्रकारचा क्षणिक निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो, याची ही घटना अत्यंत वेदनादायी आठवण ठरली आहे.
ಬಸ್ ಕಿಟಕಿಯಿಂದ ತಲೆ ಹೊರಹಾಕಿದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಟಿಪ್ಪರ್ ಡಿಕ್ಕಿ; ಶಿರಚ್ಛೇದವಾಗಿ ದುರ್ಮರಣ.
ಕುಂದಗೋಳ (ಧಾರವಾಡ): ವರದಿಗಾರ
ಬಸ್ನ ಕಿಟಕಿಯಿಂದ ತಲೆ ಹೊರಹಾಕಿದ್ದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯ ತಲೆ ಟಿಪ್ಪರ್ಗೆ ಡಿಕ್ಕಿಯಾಗಿ ದೇಹದಿಂದ ಬೇರ್ಪಟ್ಟ ಹೃದಯವಿದ್ರಾವಕ ಘಟನೆ ಧಾರವಾಡ ಜಿಲ್ಲೆಯ ಕುಂದಗೋಳದಲ್ಲಿ ನಡೆದಿದೆ. ಈ ಘಟನೆಯಲ್ಲಿ ಮೃತಪಟ್ಟ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಯನ್ನು ಫಕೀರೇಶ್ (17) ಎಂದು ಗುರುತಿಸಲಾಗಿದೆ.
ಶಿರೂರು ಗ್ರಾಮದ ನಿವಾಸಿಯಾಗಿದ್ದ ಫಕೀರೇಶ್ ಐಟಿಐನಲ್ಲಿ ವ್ಯಾಸಂಗ ಮಾಡುತ್ತಿದ್ದನು. ಆತ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಿಂದ ಗದಗ ಜಿಲ್ಲೆಯ ಲಕ್ಷ್ಮೇಶ್ವರಕ್ಕೆ ತೆರಳುತ್ತಿದ್ದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ರಸ್ತೆ ಸಾರಿಗೆ ಸಂಸ್ಥೆಯ (ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ) ಬಸ್ನ ಹಿಂಬದಿ ಆಸನದಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದನು.
ಪ್ರಯಾಣದ ವೇಳೆ ಉಗುಳಲು ಧಾವಿಸುತ್ತಿದ್ದ ಬಸ್ನ ಕಿಟಕಿಯಿಂದ ತಲೆ ಹೊರಹಾಕಿದ್ದನು. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ಎದುರಿನಿಂದ ವೇಗವಾಗಿ ಬಂದ ಟಿಪ್ಪರ್ ಡಿಕ್ಕಿ ಹೊಡೆದ ಪರಿಣಾಮ, ಫಕೀರೇಶ್ನ ತಲೆ ದೇಹದಿಂದ ಬೇರ್ಪಟ್ಟಿತು. ಪರಿಣಾಮವಾಗಿ ಸ್ಥಳದಲ್ಲೇ ಆತ ಮೃತಪಟ್ಟಿದ್ದಾನೆ.


