
नंदगड : प्रतिनीधी
खानापूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार इरफान तालीकोटी यांच्या नंदगड येथील प्रचार फेरीस नंदगड व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,

आज नंदगड येथील क्रांतिवीर संगोळी रायान्ना यांच्या मूर्तीला इरफान तालिकोटी यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली, प्रचार फेरी नंदगड गावात व बाजार पेठेतून फिरून हालशी बस स्टॉप जवळ प्रचार फेरी आली असता त्या ठिकाणी प्रचारफेरी ची समाप्ती करण्यात आली यावेळी प्रचार फेरीत नंदगड व परिसरातील अनेक गावातील युवक, नागरिक, व महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता,

नंदगड येथे प्रचार फेरीस सुरू होण्यापूर्वी आम आदमी पक्षाचे तालूका अध्यक्ष भैरू पाटील व त्यांच्या कार्यकर्त्यांनी क्रांतीवीर संगोळी रायान्ना चौकात इरफान तालीकोटी यांना आम आदमी पक्षाचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला, यावेळी आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते,
