
खानापूर ; खानापूर तालुक्यातील इदलहोंड गावात वीट भट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या कामगारांच्या झोपडपट्ट्यांना आग लागून मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यात संसार उपयोगी वस्तू जळाल्याने चार कुटुंबाचे आर्थिक नुकसान झाले आहे इदलहोंड येथील संजय चांगाप्पा जाधव यांच्या शेतवडीत चार कुटुंबे आपल्याला राहण्यासाठी झोपड्या बांधून त्या ठिकाणी राहून विटा मारण्याचे काम करत होते,

पण शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास एका झोपडीला प्रथमता आग लागली त्यानंतर ताबडतोब एकापाठोपाठ एक अशा चारही झोपड्या व त्यातील जीवनोपयोगी साहित्य कपडेलते जळून खाक झाले आहेत, तहसीलदारांच्या आदेशानुसार तलाठ्यांनी पंचनामा केला आहे
