
खानापूर : सर्वोदय इंग्रजी शाळेच्या पटांगणात दि 19 फेब्रुवारी रोजी खास शीवजयंती नीमीताने आपण आपल्या नावाने इरफान तालीकोट्टी डान्स व सींगींग स्पर्धा आयोजित केली असून तीची जय्यत तयारी सुरु असल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते व कॉंग्रेसचे युवा नेते इरफान तालीकोट्टी यांनी आज बोलावीलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे,

सदर स्पर्धा राजकीय हेतूने ठेवलेली नसुन या स्पर्धेसाठी सर्व पक्षीय नेतेमंडळीना सुद्धा आमंत्रित केलेले आहे सदर स्पर्धा पहाण्यासाठी प्रेषकाना बसण्यासाठी 8 हजार आसनांची व्यवस्था केली असून स्टेज वरील विद्युत रोषणाई व आदी साहित्य मुंबई वरून मागविले असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच याठिकाणी तालुक्यातून व ईतर ठिकाणाहुन स्पर्धा पहाण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून सर्वानी उपस्थित राहण्याची विनंती त्यांनी केली आहे, सदर स्पर्धेचे नंबर काढण्यासाठी कोल्हापूर, बेळगाव, व गोकाक येथील जजांची नेमणुक केली असुन दि 12 फेब्रुवारी रोजी चाचणी परीक्षा घेवुन स्पर्धकांची नीवड केली असल्याचे सांगितले

या स्पर्धेतील विजेता संघाला
राज्यस्तरीय खुल्या ग्रुप डान्स स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 22,222 रू दुसरे पारितोषिक 15,555 रू तर तीसरे पारितोषिक 11,111 देण्यात येणार आहे
हायस्कूल स्तरावर फक्त खानापूर तालूक्यासाठी डान्स स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 15,555 रू,दूसरे पारितोषिक 11,111 रू,तर तीसरे पारितोषिक 7,777 रू, देण्यात येणार आहे,

हायर प्रायमरी शाळेसाठी डान्स स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 15,555 रू, दुसऱे पारितोषिक 11,111 रू, तर तीसरे पारितोषिक 7,777 रू ठेवण्यात आले आहे,
गाण्याच्या ( सींगींग) राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 7,777 रू, दुसरे पारितोषिक 5,555 रू तीसरे पारितोषिक 3333 रू देण्यात येणार आहे,
खानापूर तालूक्यासाठी हायस्कूल स्तरावर पहिले पारितोषिक 5,555 रू, दुसरे पारितोषिक 3,333 रू, तर तीसरे पारितोषिक 2222 रू, देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली, सदर स्पर्धा खानापूर व तालूक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांना स्टेज मिळवून त्यांच्या कलागुणांना वाव, संधी, मिळावीत या उदात हेतूने आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले,
