
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अध्यात्मिक धर्मगुरू श्री दत्त पद्मनाभ पीठाचे विद्यमान पीठाधिश्वर पद्मश्री विभूषित धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी महाराजांच्या आशीर्वादाने संत समाज खानापूर झोन आणि सद्गुरु होमिओकेअर यांच्या संयुक्त आयोजनाने लोकमान्य संस्थेचे रावसाहेब महाविद्यालय खानापूर येथे “पीसीओडी आणि वुमन्स हेल्थ विथ होमिओपॅथी” या विषयावर डॉ गौरेश भालकेकर यांचे व्याख्यान सुसंपन्न झाले.

देशातील अनेक तरुण मुली आणि महिला पीसीओडी या गंभीर आजाराने त्रस्त आहेत,बहुतांश मुलींना या आजाराबद्दल माहितीही नाही अशा परिस्थितीत या तरुणींना या गंभीर आजाराबद्दल माहिती देऊन त्या आजाराची कारणे, लक्षणे आणि होमिओपॅथिक औषध प्रणालीचे फायदे तसेच या आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत करणाऱ्या आहार पद्धती आणि योगशास्त्राची माहिती सांगितली.

व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. शरयु कदम सहित महाविद्यालयीन प्राध्यापिका, उद्योजक निवृत्ती पाटील तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक मुरगोड यांनी केले.
प्राचार्य शरयू कदम यांनी आभार प्रदर्शन केले.
