
खानापूर जांबोटी मार्गे गोव्याकडे होणारी अवजड वाहतूक बंद करावीत, अन्यथा 24 सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन.
खानापूर ; गोवा चोर्ला मार्गे व्हाया खानापूर होणारी अवजड वाहतूक आठ दिवसांत बंद करण्यात यावीत, अन्यथा आठ दिवसानंतर, मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक नऊ वाजता, समस्त जांबोटी परिसरातील नागरिकांसह जांबोटी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा, जांबोटी ग्रामपंचायतचे उपाध्यक्ष सुनील देसाई यांनी प्रशासनाला दिला आहे.

खानापूर मार्गे अवजड वाहतूक करणारी वाहने रस्ता अरुंद असल्याने, वरचेवर रस्त्यावर अडकत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होत आहे. व याचा नाहक त्रास जांबोटी भागातील नागरिकांना होत आहे. त्यासाठी अवजड वाहतूक बंद करण्याचे ठोस आश्वासन, जोपर्यंत प्रशासनाकडून मिळत नाही. तोपर्यंत जांबोटी येथील बस स्टैंड चौकातील महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच आमदार विठ्ठलराव हलगेकर व खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, यांनी खानापूर ते जांबोटी या रस्त्याची झालेली दयनीय दुरावस्थेची दखल घेऊन, राज्य सरकारकडे आणि केंद्र सरकारकडे, या गोष्टींचा पाठपुरावा करून, हा रस्ता त्वरित दुरुस्त करून, जांबोटीवासीय व सर्वसामान्य जनता, तसेच विद्यार्थी वर्ग, तसेच शेतकरी समाजाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती सुनील देसाई, उपाध्यक्ष जांबोटी ग्रामपंचायत, यांनी केली आहे.
ಖಾನಾಪುರ ಜಾಂಬೋಟಿ ಮೂಲಕ ಗೋವಾಕ್ಕೆ ಭಾರೀ ವಾಹನ ಸಂಚಾರ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸಬೇಕು ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಸೆ.24ರಂದು ರಸ್ತಾ ರೋಕೋ ಆಂದೋಲನ.
