देसुर वाघवडे रोड येथे रविवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संचलित श्री सिद्धेश्वर गोशाळेच्या नवीन वास्तूचे उद्घाटन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी यांच्या शुभहस्ते होणार आहे,
त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच्या अगोदरच्या दिवशी दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता नवीन वास्तूचा होम हवन व पूजा कार्यक्रम होणार आहे यावेळी अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत