
आज दुपारी 12-30 च्या दरम्यान खानापूर – बेळगाव महामार्गावर काटगाळी क्रॉसवर दुचाकीस्वाराची महिलेला धडक बसल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे, धडक इतकी जोराची होती की महिलेच्या डोकीला मार बसून रक्त प्रवाह सुरू होता व महिला रक्तबंबाळ झाली होती, नेमक त्यावेळेस तेथुन जात असलेले टायगर ग्रुप चे अध्यक्ष पिराजी वालेकर ग्रुपचे उपाध्यक्ष सुरेश करडी प्रशांत मुरकुटे युवा सेनेचे खानापूर तालुका प्रमुख कुपटगिरीचे रहिवासी भरत पाटील यांनी सदर महिलेला ॲम्बुलन्स बोलावून त्यामध्ये घालून बेळगाव सिव्हील हॉस्पिटल ला पाठविले सदर महिला पीरणवाडी गावची असल्याचे समजते,
