
आम आदमी पार्टीच्या वतीने आज उप तहसीलदार कोलकार साहेब यांना निवेदन देण्यात आले, त्यात असे म्हटले आहे की पंजाब राज्यात गेल्या वर्षी 3800 रू टनाला दर देण्यात आला पण खानापूरातील लैला शुगरने गेल्या वर्षी 2700 रू दिला तर या वर्षी 2500 रू पहीला हप्ता देण्याचे जाहीर केले आहे हा एकप्रकारे शेतकर्यांवर अन्याय असुन आपण यात लक्ष घालून यावर्षी ऊसाला टनाला 3800 रू दर देण्यास भाग पाडावेत अशी मागणी केली आहे यावेळी पार्टीचे अध्यक्ष भैरू पाटील, गोपाळ गुरव, रवी बनोशी, शिवाजी गुंजीकर व आपचे कार्यकर्ते उपस्थित होते,

