
खानापूर तालुक्यातील शेडेगाळी गावात उद्या मंगळवार दिनांक 13 डिसेंबर रोजी गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,
उद्या सायंकाळी सहानंतर गावात गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उद्या सायंकाळी सहा वाजल्यानंतर पूजा गोंधळ कार्यक्रमाला सुरुवात होणार असून पुजा विधी कार्यक्रम झाल्यानंतर गोंधळ घालण्यात येऊन देवाला रात्री बारा वाजता बोकडाचा मान पान देऊन पूजा विधी होणार आहे त्यानंतर पहाटे महाप्रसाद होणार आहे त्यानंतर बुधवारी दुपारी व रात्री गावातील नागरिकांनी आपापल्या घरी आपल्या नातेवाईकांना व मित्रपरिवारांसाठी गोंधळाचे औचित्य साधून स्नेह भोजनाचे आमंत्रण दिले आहे, सदर गोंधळ कार्यक्रम पाच वर्षातून एकदा केला जातो पण कोरोना मुळे दोन वर्षे उशिरा म्हणजे सात वर्षातून भरवला जात आहे त्यामुळे एकूणच मंगळवारी व बुधवारी गावाला जत्रेचे स्वरूप येणार आहे,
