
केवळ बारा किलोमीटर अंतरासाठी बेकायदेशीर टोल आकारणी करणारा टोल नाका बंद करण्यासाठी आंदोलन. सर्वपक्षीय नेते मंडळी व नागरिकांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे.
खानापूर : खानापूर बेळगाव महामार्गावरील गणेबेल येथे उभारण्यात आलेला टोल नाका बेकायदेशीर असून, अवघ्या बारा किलोमीटरसाठी, या ठिकाणी टोल आकारणी सुरू आहे. तसेच कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन सुरू आहे. मासिक पास असून देखील गाड्या सोडण्यात येत नाहीत. भारतीय सैनिक सुट्टीवर आले असता, त्यांच्या गाड्या सोडण्यात येत नाहीत. त्यांच्याशी अरेरावीचे व उद्धट वर्तन करण्यात येत आहे. तीस ते साठ किलोमीटर अंतरासाठी टोल नाका उभारला जातो परंतु रस्ता अपूर्ण असताना सुद्धा, केवळ बारा किलोमीटरसाठी टोल आकारणी करण्यात येत आहे.

त्यासाठी हा टोल नाका बंद करण्यात यावा, यासाठी आज सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 पर्यंत गणेबैल येथील टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व वाहनधारकांनी तसेच गणेबैल, माळअंकले, झाडआंकले, निटूर, येथील शेतकऱ्यांनी तसेच माजी सैनिक संघटना, व सर्वपक्षीय नेते मंडळींनी या ठिकाणी उपस्थित राहून या आंदोलनात भाग घेऊन हा टोल नाका बंद करणे गरजेचे आहे
