
कर्नाटक राज्य वननिगमचे संचालक माजी तालुका पंचायत सदस्य भाजपा नेते सुरेश देसाई यांनी सीएसआर फंडातून तालुक्यातील दहा गावातील शाळांना दहा संगणक मंजूर करून आणले असून आज कान्सुली गावातील हायस्कूलला गावातील पंचमंडळीच्या प्रमुख उपस्थितीत संगणक सुपूर्द केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुकाध्यक्ष संजय कुबल, गावातील पंचमंडळी नागरीक व शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते

वननिगमचे संचालक सुरेश देसाई यांनी तालुक्यातील कुपटगिरी हायस्कूल, बिदर भावी प्रायमरी शाळा, गर्लगुंजी मुलींची प्रायमरी शाळा, निटूर प्रायमरी शाळा, काटगाळी प्रायमरी शाळा, नागुर्डा प्रायमरी शाळा, कान्सुली हायस्कूल, कोडचवाड येथील कन्नड शाळा, मोदेकोप प्रायमरी शाळा, तसेच गणेबैल गावातील मुलामुलींची शाळा, या एकुण दहा शाळेना सीएसआर फंडातून फंड मंजूर मंजूर करून आणला असून त्यातूनच संगणक वितरित करण्यात येत आहेत,

त्यामुळे शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थी वर्ग खूप आनंदात आसुन सुरेश देसाई यांना धन्यवाद देत आहेत बेळगाव जिल्ह्यातून वननिगमचे संचालक म्हणून नेमणूक झालेले सुरेश देसाई हे पहिलेच व्यक्ती असून त्याचा उपयोग ते खानापूर व बेळगाव साठी करत आहेत,

तसेच गणेबैल गावातील मुला मुलींच्या शाळेसाठी बाथरूम व टॉयलेट बांधण्यासाठी सुद्धा त्यांनी फंड मंजूर करून आणला असून लवकरच त्याची सुरुवात होणार आहे,

