
राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था वाचनालय कावळेवाडी बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पाच हजार मीटर भव्य मॅरेथॉन स्पर्धेत महिला विभागातून खानापूर तालुक्यातील वीद्यार्थीनीनी पहिला व चौथा क्रमांक पटकावला,
निटूर गावची रहिवासी व ताराराणी मराठा मंडळ पदवीपूर्व महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली वीद्यार्थीनी कुमारी आकांक्षा गणेबैलकर हीने पहिला क्रमांक पटकावला तर आंबेवाडी ता खानापूर गावची रहिवासी जैन कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत असलेली आरती पाटील या विद्यार्थीनीने चौथ्या क्रमांकाचे बक्षीस पटकाविले, सदर विद्यार्थीनीना गर्लगुंजी गावातील जेष्ठ प्रशिक्षक लक्ष्मण गोपाळ कोलेकर व अनिल कृष्णा गोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे, सदर दोन्ही प्रशिक्षकानी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून नॅशनल, इंटरनॅशनल स्पर्धेत गोल्ड मेडलीस्ट बनविले आहे,
सदर वीद्यार्थीनीनी मॅरेथॉन स्पर्धेत यश संपादन केल्यामुळे तालुक्यातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे,
