
मणतुर्गा : खानापूर तालुक्यातील मणतुर्गा येथे खास शिवरात्रीच्या नीमीताने शीवजयंतीचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे युवा पदाधिकारी गजानन गावडू पाटील, यांनी शीवजयंती दिवशी दि 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वा भव्य आणि दिव्य अशा रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित केल्या आहेत,उदघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री राजाराम रवळू पाटील प्रगतशील शेतकरी मणतुर्गा हे रहाणार आहेत,
भाजपा तालूका अध्यक्ष संजय कुबल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन होणार असून, प्रमुख वक्ते पंडित ओगले असुन दीपप्रज्वलन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाजपा नेते अरविंद पाटील, भाजपा नेते व महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर, भाजपा नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव देसाई, तसेच जोतीबा प्रल्हाद रेमाणी माजी जिल्हा परिषद सदस्य, वननिगमचे राज्य संचालक सुरेश देसाई, भाजपाचे माजी अध्यक्ष विठ्ठल क पाटील, भाजपा नेते मारूती पाटील, चांगाप्पा बाचूळकर, सदानंद होसूरकर, गुंडू तोपिनकट्टी अशोक देसाई विनायक पाटील संदीप देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन होणार असुन यावेळी अनेक मान्यवर सुद्धा उपस्थित राहणार आहेत,
सदर डान्स स्पर्धेसाठी खुल्या गटासाठी पहिले पारितोषिक 8,001 रू, मारूती पाटील भाजपा नेते गव्ह कॉन्ट्रॅक्टर उचवडे व चांगाप्पा बाचुळकर ग्रां पं अध्यक्ष इदलहोंड यांच्या संयुक्त विद्यमाने तर दुसरे पारितोषिक 6001 रु विनायक प्र पाटील भंडारगाळी यांच्याकडून तर तिसरे पारितोषिक 4001 रू सदानंद होसुरकर भाजपा रयत मोर्चा उपाध्यक्ष यांच्याकडून, चौथे पारितोषिक 2501 रु, श्रीकांत बोबाटे मणतुर्गा यांच्याकडून, पाचवे पारितोषिक 1501 रु मंगेश राजाराम पाटील भंडारगाळी यांच्याकडून, पारितोषिक 1001 रू जोतिबा मा पाटील हारूरी यांच्याकडून, सातव्या क्रमांकासाठी 501 रू गुंडू संभाजी पाटील याच्याकडून देण्यात येणार आहे,
लहान गटासाठी (14 वर्षाखालील) मुलासाठी, पहिले पारितोषिक 5001 रू शनया फुटवेअर सिंडीकेट बँक जवळ यांच्याकडून, दुसरे पारितोषिक 3001 रू सुरेखा भगवंत घाडी ग्रां पं अध्यक्षा मणतुर्गा व रमेश चव्हाण ग्रां पं सदस्य मणतुर्गा यांच्या संयुक्त विद्यमाने, तीसरे पारितोषिक 2001 रू प्रतिक्षा परशराम शीवठणकर यांच्याकडून
चौथे पारितोषिक 1001 रू एम जी गारमेंट यांच्याकडून तर पाचवे पारितोषिक 501 विनोद देसाई मणतुर्गा यांच्याकडून देण्यात येणार आहेत,
