रूमेवाडी : दि १३ (यश घाडी) खानापूर शहराला लागून असलेल्या रूमेवाडी गावातील नागरीक रोहिदास व्यंकाप्पा दळवी यांच्या घरचा मागील दरवाजा फोडून चार तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले असुन सदर गुन्हाची नोंद खानापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असुन अधिक तपास पोलीस करत आहेत,
याबाबत समजलेली माहीती अशी की रोहिदास दळवी यांच्या पत्नी आज सकाळी नातेवाईकांच्या एका अंतीम संस्काराला गेल्या होत्या तर थोड्या वेळानंतर रोहिदास दळवी हे आपल्या मुलांना चप्पल आणण्यासाठी त्यांना सोबत घेऊन घरी कुलूप लावुन खानापूर च्या बाजारात एक तासभर गेले असता सदर चोरीची घटना घडल्याचे समजते,
परवा भालके गावात सुध्दा दिवसा चोरीची घटना घडली होती, त्यामुळे सध्या खानापूर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन खानापूर पोलीसांनी यात गांभीर्याने लक्ष घालून सदर चोरांचा शोध घ्यावात व अश्या वरचेवर घडनार्या चोरीच्या घटनांना आळा घालावात असी मागणी नागरीकांच्यातून होत आहे,