खानापुरात हेस्कॉमचा भोंगळ कारभार; व्यावसायिकांची तारांबळ! शनिवारची सुट्टी वाया; रविवारी अचानक वीज कपातीची घोषणा!
खानापूर : प्रतिनिधी
खानापूर शहर व तालुक्यातील काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत हेस्कॉम खात्याकडून करण्यात येत असलेल्या अनियोजित घोषणांमुळे व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी व नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, हेस्कॉमच्या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शनिवारी वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे अचानक वृत्त प्रसारित करण्यात आले. मात्र, दिवसभर विद्युत पुरवठा सुरळीत राहिल्याने नागरिकांसह व्यावसायिकांची मोठी निराशा झाली.
शनिवारी विद्युत पुरवठा खंडित होणार असल्याच्या वृत्तामुळे अनेक व्यावसायिकांनी आपल्या उद्योगधंद्यांना सुट्टी जाहीर केली होती. काही व्यावसायिकांनी शनिवारची सुट्टी रविवारी भरून काढण्याचे नियोजन करून कर्मचाऱ्यांना शनिवारी सुट्टी दिली, तर रविवारी कामावर उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, शनिवारी दिवसभर वीजपुरवठा खंडित न झाल्याने या नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला.
लोंढा येथील प्रजासेवा कार्यक्रमाचे कारण?….
लोंढा येथे प्रजासेवा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला नसल्याचे समजते. मात्र, लोंढा येथील प्रजासेवा कार्यक्रमाची माहिती चार ते पाच दिवस अगोदरच वृत्तपत्रे व सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे संबंधित कार्यक्रमाची माहिती हेस्कॉम अधिकाऱ्यांना नव्हती काय? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
कार्यक्रमाचे नियोजन पूर्वीपासून माहीत असतानाही विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत अचानक सूचना देणे आणि नंतर तो कार्यक्रम रद्द करणे, यामुळे हेस्कॉम खात्याच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रविवारी पुन्हा अचानक वीज कपातीची घोषणा!….
शनिवारी विद्युत पुरवठा खंडित करण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे कारण देत आज रविवारी खानापूर शहरासह तालुक्यातील काही भागात विद्युत पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांमध्ये अचानक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामुळे शनिवारची सुट्टी जाहीर करून रविवारी उद्योगधंदे सुरू ठेवण्याचे नियोजन करणाऱ्या व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः हॉटेल व्यावसायिक, दुकानदार, विविध उद्योगधंदे आणि कामगार वर्गाला या अनिश्चित वीज कपातीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शनिवार-रविवारच्या सुट्ट्यांचे नियोजन बदलल्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक गणितेही बिघडली आहेत.
शेतकऱ्यांचेही पाणी नियोजन विस्कळीत….
वीज कपातीच्या या अनिश्चित प्रकारामुळे शेतकरी वर्गालाही मोठा फटका बसत आहे. शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचे नियोजन करावे लागते. शनिवारी वीज जाणार म्हणून नियोजन केले, मात्र वीज गेली नाही. आता रविवारी वीज खंडित होणार असल्याने पुन्हा नव्याने नियोजन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
आर्थिक नुकसान भरपाई अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करा!….
वीज पुरवठा खंडित करायचा असल्यास किमान दोन ते चार दिवस अगोदर अधिकृत सूचना देणे आवश्यक आहे. अचानक वीज कपातीच्या घोषणांमुळे नागरिकांना व व्यावसायिकांना होणाऱ्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
हेस्कॉम खात्याच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असल्यास त्याची भरपाई संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत किमान दोन दिवस अगोदर अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
सोशल मीडियाचा वापर करून वेळेवर माहिती देणे शक्य!
खानापूर तालुक्यात सोशल मीडिया अत्यंत प्रभावी असून, विविध माहिती काही मिनिटांत नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आहे. हेस्कॉम अधिकाऱ्यांनी शनिवारीच वेळेवर माहिती प्रसारित करण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग केला असता, तर व्यावसायिक, शेतकरी व नागरिकांना आपल्या कामाचे नियोजन करता आले असते. मात्र, ऐनवेळी वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांना अडचणीत आणण्याच्या प्रकारामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत आहे.
सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी….
खानापूर तालुक्यात वारंवार होणाऱ्या अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या प्रकाराला नागरिक अक्षरशः कंटाळले आहेत. संबंधित हेस्कॉम अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करून नियोजनपूर्वक वीज कपातीची माहिती नागरिकांना द्यावी, तसेच या प्रकाराला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
एकंदरीत, खानापूरमधील हेस्कॉम खात्याच्या या नियोजनशून्य कारभाराला नागरिकांकडून “आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय” अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या कार्यक्रमात योग्य नियोजन व वेळेवर सूचना देण्याची जबाबदारी हेस्कॉम खात्याने पार पाडावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भावना व्यक्त होत आहे.
ಖಾನಾಪುರ ಹೆಸ್ಕಾಂನ ಅವ್ಯವಸ್ಥಿತ ಕಾರ್ಯವೈಖರಿ: ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಪರದಾಟ! ಶನಿವಾರದ ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತ ರದ್ದು; ಭಾನುವಾರ ದಿಢೀರ್ ವಿದ್ಯುತ್ ಸ್ಥಗಿತದ ಘೋಷಣೆ!
ಖಾನಾಪುರ : ಪ್ರತಿನಿಧಿ
ಖಾನಾಪುರ ನಗರ ಹಾಗೂ ತಾಲೂಕಿನ ಕೆಲವು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಸ್ಥಗಿತಗೊಳಿಸುವ ಕುರಿತು ಹೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆ ನೀಡುತ್ತಿರುವ ಗೊಂದಲಮಯ ಸೂಚನೆಗಳಿಂದ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು, ಉದ್ಯಮಿಗಳು, ರೈತರು ಹಾಗೂ ಸಾರ್ವಜನಿಕರು ತೀವ್ರ ತೊಂದರೆ ಅನುಭವಿಸುವಂತಾಗಿದೆ.
ಶನಿವಾರ ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತವಾಗಲಿದೆ ಎಂಬ ಮುನ್ಸೂಚನೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ತಮ್ಮ ಉದ್ಯಮಗಳಿಗೆ ರಜೆ ಘೋಷಿಸಿದ್ದರು. ಆದರೆ, ಇಡೀ ದಿನ ವಿದ್ಯುತ್ ಪೂರೈಕೆ ಸುಗಮವಾಗಿತ್ತು. ಲೋಂಡಾ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪ್ರಜಾಸೇವಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತದ ನಿರ್ಧಾರ ಕೈಬಿಡಲಾಗಿದೆ ಎನ್ನಲಾಗುತ್ತಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಮಾಹಿತಿ ಮೊದಲೇ ಲಭ್ಯವಿದ್ದರೂ ಹೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆ ಸೂಕ್ತ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸದಿರುವುದು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಅಸಮಾಧಾನಕ್ಕೆ ಕಾರಣವಾಗಿದೆ.
ಇದೀಗ ಶನಿವಾರದ ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತ ರದ್ದುಗೊಂಡ ಬೆನ್ನಲ್ಲೇ, ಭಾನುವಾರ ಖಾನಾಪುರ ಸೇರಿದಂತೆ ತಾಲೂಕಿನ ಕೆಲವು ಭಾಗಗಳಲ್ಲಿ ವಿದ್ಯುತ್ ಸ್ಥಗಿತಗೊಳ್ಳಲಿದೆ ಎಂಬ ಸುದ್ದಿ ಪ್ರಕಟವಾಗಿರುವುದು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಲ್ಲಿ ಮತ್ತಷ್ಟು ಗೊಂದಲ ಮೂಡಿಸಿದೆ. ಶನಿವಾರ ರಜೆ ನೀಡಿ ಭಾನುವಾರ ವ್ಯಾಪಾರ ನಡೆಸಲು ಯೋಜಿಸಿದ್ದ ಹೋಟೆಲ್ ಮಾಲೀಕರು, ಅಂಗಡಿಕಾರರು ಹಾಗೂ ಉದ್ಯಮಿಗಳಿಗೆ ಇದರಿಂದ ಆರ್ಥಿಕ ನಷ್ಟವಾಗುವ ಆತಂಕ ಎದುರಾಗಿದೆ.
ರೈತರಿಗೂ ಸಂಕಷ್ಟ
ವಿದ್ಯುತ್ ಅವಲಂಬಿತ ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೂ ಈ ಅನಿಶ್ಚಿತತೆ ಹೊಡೆತ ನೀಡಿದೆ. ಬೆಳೆಗಳಿಗೆ ನೀರುಣಿಸುವ ಯೋಜನೆಯನ್ನು ರೈತರು ಮುಂಚಿತವಾಗಿ ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗಿರುವುದರಿಂದ, ಪದೇಪದೇ ಬದಲಾಗುವ ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತದ ಸೂಚನೆಗಳು ಕೃಷಿ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ ಅಡ್ಡಿಯಾಗುತ್ತಿವೆ.
ಮುಂಚಿತ ಮಾಹಿತಿ ನೀಡಲು ಆಗ್ರಹ
ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತ ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿದ್ದರೆ ಕನಿಷ್ಠ ಎರಡು ದಿನಗಳ ಮುಂಚಿತವಾಗಿ ಅಧಿಕೃತ ಮಾಹಿತಿ ನೀಡಬೇಕು. ಸಾಮಾಜಿಕ ಮಾಧ್ಯಮಗಳ ಮೂಲಕವೂ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಸಮಯಕ್ಕೆ ಸರಿಯಾಗಿ ಮಾಹಿತಿ ತಲುಪಿಸಲು ಹೆಸ್ಕಾಂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬುದು ನಾಗರಿಕರ ಒತ್ತಾಯವಾಗಿದೆ.
ಹೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆಯ ಇಂತಹ ಯೋಜನಾರಹಿತ ಕಾರ್ಯವೈಖರಿಯಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹಾಗೂ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಅನುಭವಿಸುವ ಆರ್ಥಿಕ ನಷ್ಟಕ್ಕೆ ಹೊಣೆ ಯಾರು ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಯೂ ಕೇಳಿಬರುತ್ತಿದೆ. ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿಗಳ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯದ ಕುರಿತು ತನಿಖೆ ನಡೆಸಿ ಸೂಕ್ತ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕು ಎಂಬ ಆಗ್ರಹ ವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ.
ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ, ವಿದ್ಯುತ್ ಕಡಿತದ ಕುರಿತು ಗೊಂದಲಮಯ ಘೋಷಣೆ ಮಾಡುವ ಬದಲು ಹೆಸ್ಕಾಂ ಇಲಾಖೆ ಪೂರ್ವಯೋಜನೆಯೊಂದಿಗೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ, ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ನಿಖರವಾದ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಮುಂಚಿತವಾಗಿ ನೀಡಬೇಕು. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಜನರ ಆಕ್ರೋಶ ಮತ್ತಷ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗುವುದರಲ್ಲಿ ಸಂದೇಹವಿಲ್ಲ.

