
नंदगड : नंदगड (ता खानापूर) पोलिस स्थानकाच्या हद्दीत असलेल्या लिंगनमठ गावाजवळ संशयास्पद सोन्या चांदीचा वाहतूक करत असल्याची माहिती मंगळवारी दि ४ रोजी दुपारी १२ वाजता नंदगड पोलिसांनी मिळताच नंदगड पोलिस स्थानकाचे पोलिस अधिक्षक बसवराज लमाणी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगनमठ जवळ हल्याळ भागातुन कक्केरीकडे जाणाऱ्या केए ६३ टी सी ०८४ /१ ए के क्रमांकाच्या कारमधून कोणत्याही कागद पत्राची पूर्तता न करता ४० लाख ३३ हजार ७२० रूपये किमतीच्या सोन्या चांदीचा एेवज सापडला. या प्रकरणी कल्याण येथील धर्मराज हणमंत कुट्रे व १२ लाखाची कार वाहन जप्त करून कारवाई करण्यात आली.
यावेळी बैलहोंगल डीएसपी रवी नायक याच्या मार्गदर्शन नंदगड पोलिस स्थानकाचे सी पी आय बसवराज लमाणी व पोलिस कर्मचारी श्री बेळवडी आदी ही कारवाई केली.
त्याचबरोबर कलम ९८ कर्नाटक पोलिस अधिनियम १९६३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलिस करत आहेत.
