
खानापूरच्या लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळात स्थानिक कंत्राटदारांना डावलून टक्केवारी साठी तालुक्या बाहेरील कंत्राटदारांना कामे दिली असून टक्केवारीमुळे कामेही निकृष्ट दर्जाची झालेली आहेत तसेच स्थानिक कंत्राटदारांना डावलल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आणली आहे, एक प्रकारे त्यांनी खानापूर तालुक्याचे वाटोळे केले आहे असा आरोप खानापूर कंत्राटदार संघटनेच्या वतीने राजा श्री शिवछत्रपती स्मारक येथे बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला व याचा बदला म्हणून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत खानापूर कंत्राटदार संघटनेच्या वतीने स्थानिक उमेदवारालाच पाठिंबा देऊन निवडून आणणार असल्याचे सर्वानी सांगितले अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष सुभाष चलवादी होते,

यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष लक्ष्मण बोटेकर गौरवअध्यक्ष मुरलीधर पाटील कार्याध्यक्ष मल्लिकार्जुन मुतगी खजिनदार विष्णू बेळगावकर सदस्य रमेश सिंगनाथ, प्रकाश गावडे, एम एम सावकार, नारायण खानापुरी, आदिजन उपस्थित होते, सुरुवातीला स्वागत मल्लिकार्जुन मुतगी यांनी केले तर प्रास्ताविक एम एम सावकार यांनी केले तर प्रकाश गावडे यांनी आज बोलाविलेल्या पत्रकार परिषदेचा उद्देश सांगितला ते म्हणाले आज पर्यंत खानापूरच्या इतिहासात जेवढे म्हणून आमदार झाले त्यांनी प्रत्येकाने स्थानिक कंत्राटदारांनाच कामे दिली होती माजी आमदार अरविंद पाटील यांनी सुद्धा राजकारण न आणता स्थानिक कंत्राटदारांना प्राधान्य दिले होते व बाहेरच्या कंत्राटदारांना स्पष्ट सांगितले होते की खानापूर तालुक्यात जी म्हणून कामे होतील ती कामे स्थानिक कंत्राटदाराकडूनच करून घेतली जातील असे सांगून त्यांनी तालुक्यातील कंत्राटदारांना चांगलेच सहकार्य केले होते परंतु आताच्या लोकप्रतिनिधींनी टक्केवारी साठी स्थानीक कंत्राटदाराना डावलून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आणुन एक प्रकारे त्यांचे वाटोळे केले असल्याचे त्यांनी सांगितले,
यानंतर पत्रकार परिषदेला सुरूवात झाली, पुढे पदाधिकारी नी माहिती देताना सांगितले की 2019 मध्ये तालुक्यातील जवळजवळ 300 कंत्राटदारानी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन स्थानिक कंत्राटदारांनाच कामे द्यावीत अशी विनंती करण्यात आली होती त्यावेळी त्यांनी आश्वासनापलीकडे काहीही केले नाही त्यानंतर संघटनेच्या वतीने धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला असता जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांची भेट घेऊन सांगितले होते की सध्या खानापुरात लक्ष्मी यात्रेला सुरूवात होणार असून त्याला गालबोट नको सध्या तात्पुरता आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता आम्ही आंदोलन मागे घेतले त्यानंतर लक्ष्मी यात्रा झाली व काही दिवसांनी कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाल्याने लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे कंत्राटदारांकडे दुर्लक्ष झाले त्यानंतर कामाला सुरुवात झाली पण परत स्थानिक कंत्राटदारांना सोडून बाहेरील कंत्राटदारांनाच कामे देऊन एक प्रकारे आमच्यावर अन्याय केला आहे तसेच त्यांनी आपल्या पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष तसेच एक महिला पदाधिकारी व जवळचे कार्यकर्ते यांच्या नावाने निविदांचे बरेच करार पत्र करून त्यांच्या नावे त्यांनी कामे केलेली आहेत व ती अतीशय निकृष्ट दर्जाची झालेली आहेत त्याची चौकशीची मागणीही त्यानी केली तसेच जे जे एम योजनेत फक्त दहा ते पंधरा टक्के कामे झालेली असताना साठ टक्के रकमेची बिले कामे अर्धवट असतानाच काढलेली आहेत तसेच बिरादार नावाच्या कंत्राटदाराने अर्धवट कामे करून बरेचसे पैसे काढले असल्याचा स्पष्ट आरोप करण्यात आला असुन त्याची चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले,
तसेच आज बऱ्याच वृत्तपत्रांना लोकप्रतिनिधींनी जाहिराती देऊन त्याच्यामध्ये अर्धवट झालेली कामे व अपुरी असलेली बरीच कामे पण पूर्ण झाली असल्याचे दाखविलेले आहे ते चुकीचे असुन त्यातील बरीचशी कामे अर्धवट आहेत एक प्रकारे लोकप्रतीनीधीनी जनतेला खोटी माहिती दिलेली आहे असाही आरोप पदाधिकारीनी केला, तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवाराला पाठींबा देवुन निवडून आणणार असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी तालुक्यातील बरेचसे कंत्राटदार व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
