
खानापूर तालुक्यात अतिशय दुर्गम भागातील रस्ते होण्यासाठी, दुर्गम भागातील गरिबांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी, वेगवेगळ्या खात्याच्या अधिकाऱ्याशी संपर्क ठेवून त्यांच्या कानावर या गोष्टी घालून लोकांच्या समस्या मार्गी लावणारे व या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांना जितू इंटरनॅशनल ट्रेड सेंटरचा “सामाजिक कार्यकर्ता” “सोशल वर्कर” पुरस्कार हायकोर्टाचे जज्ज, तसेच जेष्ठ वकील मंडळी व विवीध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच देण्यात आला,

शिरसी, सिद्धापूर, खानापूर हा प्रदेश पश्चिम घाट प्राधिकरण म्हणून ओळखला जातो या ठिकाणी घनदाट जंगल असून जंगली प्राण्यांचा त्रास शेतकऱ्यांना कायमस्वरूपी असतो त्या समस्या वारंवार फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगून समस्या निवारण करणे तसेच झेड पी, टी पी व इतर डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून गोरगरीब जनतेच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांची कायम जाणीव करून देणे व समस्या मार्गी लावणे, अतिशय दुर्गम भागातील रस्त्यासाठी प्रयत्न करणे तसेच तालुक्यात गवळी समाजाच्या 50 पेक्षा जास्त छोट्या मोठ्या वस्त्या असून त्यांचा विकास होण्याचा दृष्टीने कायम स्वरूपी प्रयत्न करत राहणे तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या मंदिरांच्या विकासासाठी व जीर्णोदरासाठी प्रयत्न करणे या सर्व बाबींचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे, याबद्दल तालुक्यातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे,
