
कारवार लोकसभेसाठी, समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई 15 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार.
खानापूर : खानापूर तालुका म. ए . समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांचा उमेदवारी अर्ज, सोमवार दिनांक 15 एप्रिल रोजी, कारवार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात येणार असून, खानापूर तालुक्यातील समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई, यांनी शुक्रवारी श्री राजा शिवछत्रपती शिवस्मारक येथे झालेल्या बैठकीत केले.
यावेळी बोलताना गोपाळ देसाई म्हणाले की, गेल्या 07 एप्रिल रोजी बैठकीत समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यासाठी आता, निवडणुकीसाठी पुढील प्रक्रिया म्हणून उमेदवारी अर्ज भरणे गरजेचे आहे.
त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एकजूट दाखवून, कारवार, हल्ल्याळ , जोयडा येथील मराठी बांधवांनी, समीतीच्या उमेदवाराच्या पाठिशी थांबले पाहिजे.
कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी सात वाजता शिवस्मारक येथे जमावेत. त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून, कारवार येथे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. तसेच समितीचे निवडणूक कार्यालय नवहिंद सोसायटी कार्यालयाच्या बाजूला येत्या काही दिवसात उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
बैठकीमध्ये समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मराठी अस्मिता जागी ठेवण्यासाठी निवडणूक लढवावी, अशी सर्वांची इच्छा आहे. त्यासाठी मी उभा असून, सर्वांनी सहकार्य करून, पुन्हा एकदा मराठी अस्मितेसाठी लढा निरंतर चालू ठेवण्यासाठी, या निवडणुकीत सर्वांनी वेळ देऊन नीवडणुक यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, वसंतराव नावलकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयराम देसाई, रमेश धबाले, विलास बेळगावकर, संजय पाटील इत्यादी मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.
बैठकीला संजीव पाटील, रणजीत पाटील, मारुती परमेकर, अमृत शेलार, नारायण पाटील, गोपाल पाटील, विवेकानंद पाटील, पुंडलिक बावडेकर, मुकुंद पाटील, जी एल हेबाळकर, प्रल्हाद घाडी, पुंडलिक पाटील, सुनील पाटील व समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी आभार कृष्णा कुंभार यांनी मांडले.
ಕಾರವಾರ ಲೋಕಸಭೆಗೆ ಸಮಿತಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಿರಂಜನ ಸರ್ದೇಸಾಯಿ ಏಪ್ರಿಲ್ 15 ರಂದು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸಲಿದ್ದಾರೆ.
ಖಾನಾಪುರ: ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಾ ಮೆ. ಅ.15ರಂದು ಸೋಮವಾರ ಕಾರವಾರ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಚೇರಿಯಲ್ಲಿ ಎ ಸಮಿತಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಿರಂಜನ ಸರ್ದೇಸಾಯಿ ಅವರ ಉಮೇದುವಾರಿಕೆ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಲಿದ್ದು, ಖಾನಾಪುರ ತಾಲೂಕಿನ ಸಮಿತಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು, ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಹಾಜರಿರಬೇಕು. ಶುಕ್ರವಾರ ಶ್ರೀರಾಜ ಶಿವಛತ್ರಪತಿ ಶಿವಸ್ಮಾರಕದಲ್ಲಿ ನಡೆದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಗೋಪಾಲರಾವ್ ದೇಸಾಯಿ ಈ ಮನವಿ ಮಾಡಿದರು.
ಗೋಪಾಲ ದೇಸಾಯಿ ಮಾತನಾಡಿ, ಏಪ್ರಿಲ್ 07 ರಂದು ನಡೆದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಮಿತಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿ ನಿರಂಜನ ಸರ್ದೇಸಾಯಿ ಅವರ ಉಮೇದುವಾರಿಕೆಯನ್ನು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈಗ ಚುನಾವಣೆಯ ಮುಂದಿನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯಾಗಿ ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಸುವುದು ಅನಿವಾರ್ಯವಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಾರವಾರ, ಹಲ್ಯಾಳ, ಜೋಯಿಡಾದ ಎಲ್ಲ ಮರಾಠಿ ಬಂಧುಗಳು ಒಗ್ಗೂಡಿ ಸಮಿತಿಯ ಅಭ್ಯರ್ಥಿಯೊಂದಿಗೆ ನಿಲ್ಲಬೇಕು.
