
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील दाखल याचीकेसाठी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी खासदार धैर्यशील माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काल मंगळवारी मुंबईतील सह्याद्री अतिगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार माने यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.
महाविकास आघाडी सरकार काळात तज्ञ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता ही जबाबदारी खासदार माने यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
