नवी दिल्ली – आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. याची घोषणा आज ( दि. ४ ) पक्षाने केली. तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.