
खानापूर : काल दुपारी नदीत बुडून मृत्यू झालेला युवक सुनील चंद्राप्पा तलवार याचा मृतदेह आज सकाळी अग्निशमन दलाच्या जवानांनी व अल्ताफ नावाच्या पट्टीच्या पोहणाऱ्या युवकाने आज सकाळी प्रयत्न करून नदीपात्रातून बाहेर काढला असुन खानापूर पोलीस व अग्निशमन दलाच्या वतीने पंचनामा करण्यात आला असुन मृतदेह उतरीय तपासणी साठी सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्यात येवुन शल्यचिकित्सका करून त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे,

काल अग्निशमन दलाच्या जवानांनी व माजी सैनिक यशवंत घाडी व संदीप पाटील यांनी अथक प्रयत्न केले होते पण यश मिळाले नव्हते वृत्त व्यक्तीच्या पश्चात पत्नी व एकदम लहान दोन वर्षाचे व तीन वर्षाचे एक मुलगा व एक मुलगी असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून नागरिकांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे
