
खानापूर – ‘ऑपरेशन मदत’ व केएलई वेणुध्वनी रेडिओ (कर्नाटक सरकार – ग्रामीण पेयजल आणि स्वच्छता विभाग तसेच जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या सहकार्याने) यांच्या संयुक्त विद्यमाने कणकुंबी हायस्कूलमध्ये बालविवाहाबाबत जनजागृती करण्यात आली
कणकुंबी येथील माऊली विद्यालयात शुक्रवार दि. 9 डिसेंबर 2022 रोजी, व्यक्तीचे आरोग्य आणि स्वच्छता तसेच बालविवाह जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बेळगांवच्या प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या महिला आणि बाल प्रसुती विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली जोशी मॅडमनी वैयक्तिक आरोग्य आणि स्वच्छते बरोबरच बालविवाहामुळे उद्भवणाऱ्या समस्या, त्याअनुषंगाने निर्माण होणाऱ्या आरोग्याविषयी तक्रारी, माणसीक आजार व गर्भारपणात पौष्टिक आहार याविषयी मार्गदर्शन केले.
खानापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व प्रोबेशनरी पीएसआय मंजुनाथ तिरकण्णावर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायद्या अनुसार पोक्सो ची प्रकरणे, ग्रामीण भागात घरगुती चोरीच्या घटना, सायबर बॅंक फसवणूक याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. केएलई वेणूध्वनी (रेडिओ एफएम) च्या कार्यकारी अधिकारी मनिषा सरनाईक यांनी उपस्थितांना थोडक्यात रेडिओ एफएम बद्दल माहिती दिली. कणकुंबी पीएचसी सेंटरचे मेडिकल ऑफिसर डाॅ. चेतन यांनी कणकुंबी भागातील नागरिकांना पालकांनी आपल्या पाल्याना समानतेने वागवण्यासोबत शासकीय वैद्यकीय विभागाची माहिती दिली, कणकुंबी माऊली हायस्कूचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर सरांनी पाहुण्यांचे परिचय, प्रास्ताविक व स्वागत केले, यावेळी मान्यवरांचे शाळेतर्फे शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्प देऊन सत्कार केला गेला. या कार्यक्रमाला केएलई वेणूध्वनीचे कार्यकारी सदस्य व सीनीयर टेक्निशियन मंजूनाथ बळ्ळारी, ‘ऑपरेशन मदत’ ग्रुपचे सदस्य, जांबोटी आउटपोस्टचे पोलिस हवालदार इस्माईल नन्नेखान व सहकारी स्टाफ, माऊली हायस्कूलचा शिक्षकवृंद, आठ ते दहा गावातून कणकुंबीला शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांचा पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी जवळपास 165 विद्यार्थ्यी व एकशे दहा पालकवर्ग उपस्थित होते. या सर्वांना कार्यक्रमानंतर लिंबाच्या रोपट्यांचे वितरण करण्यात आले.
